धक्कादायक; लोअर परेलमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक; लोअर परेलमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

लोअर परेलमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

लोअर परेलमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. यातील एका आरोपीसोबत तरुणीचे प्रेम संबध होते. वरळी येथून तरुणाने मुलीला लोअरपरळ येथील घरी आणून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे सहा आरोपींमधील तिघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com