धक्कादायक: औरंगाबादेत स्वयंपाकघरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

धक्कादायक: औरंगाबादेत स्वयंपाकघरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह आढळून आला आहे.

औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा असल्याने मृतदेह महिलेचा आहे की पुरुष याबाबत खात्री होऊ शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. ज्यात तळमजल्यात सात तर वरच्या मजल्यात तीन रुम बांधलेल्या आहेत. दरम्यान सात महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड (रा. धानोरा, ता. फुलंब्री) यांना तळमजल्यात दोन खोल्या भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिल्या होत्या. भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्यास होते.

भुईगड यांचा फोन बंद असल्याने शेळके यांनी त्यांचा घराचा दरवाजा तोडला तर घरातील किचन ओट्याखाली खोदकाम करुन तो सिमेंट-वाळूने बंद केलेला आणि त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू ठेवलेले दिसून आल्याने शेळके यांना संशय आला. नी खोदकाम सुरु केले. यावेळी त्यांना एका चादरीत मिठात गुंडाळलेला कुजलेला मृतदेह दिसून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. तसंच नरबळीचाही प्रकार असू शकतो असाही प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com