धक्कादायक; चार मुलींनी एका युवकाचे अपहरण करून केला सामूहिक बलात्कार
पंजाबमधील जालंधरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री चार मुलींनी एका तरुणाचे अपहरण केले. यानंतर तरुणाला अज्ञातस्थळी नेऊन त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार तरुणींनी आपल्याला कारमध्ये कोंबले. त्यानंतर अपहरण करून रात्रभर शरीर संबंध ठेवले, असे त्या तरुणाने सांगितले. त्यानंतर त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईट्सवर शेअर होत आहे.
रविवारी रात्री जालंधर येथील लेदर कॉम्प्लेक्स रोडवरील एका कारखान्यात काम करून घरी परतणाऱ्या तरुणाचे कारमधील चार मुलींनी अपहरण केले. ते त्याला अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तरुणाने सांगितले की, मी कारखान्यातून घऱी जात होतो. तेव्हा मागून एक कार जवळ येऊन थांबली. त्यातून चार तरुणी प्रवास करत होत्या. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी चिठ्ठी दिली. मी चिठ्ठी वाचत असताना त्यांनी माझ्या डोळ्यांत काही तरी टाकले. तसेच डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर माझे हातपाय बांधून मला कारमध्ये कोंबले. त्यानंतर या तरुणींनी कार एका निर्मनुष्य ठिकाणी नेली. मला अंमली पदार्थ दिले. नंतर त्या चौघींनीही त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. या सर्व तरुणींचं वय हे २२ ते २३ वर्षांदरम्यान होतं. तसेच एकंदरीत त्या चांगल्या घरातील वाटत होत्या. त्या सर्वजणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलत होत्या. लाजेमुळे पोलिसांत तक्रार करायला गेलो नसल्याचे त्याने सांगितले.