पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना; रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना; रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

ससून रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
Published on

ससून रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ससून रुग्णालयात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. मृत्यू झालेला रुग्ण 30 वर्षांचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

सागर रणुसे असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. 15 तारखेला सागरचा दुचाकी चालवत असताना अपघात झाला होता. 17 मार्च रोजी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते तसेच 25 तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सागर याला आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी आयसीयूमध्ये सागर याला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे. नातेवाईकांनी हा आरोप केला असून यामध्ये काही तथ्य नसल्याचे ससून रुग्णालय प्रशासनने स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com