सुनील पाल अपहरणप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
विनोदवीर सुनील पाल हे बेपत्ता झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर सुनील पाल यांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली. अपहरणकर्त्यांनी पाल यांना सोडवण्यासाठी 20 लाखांची खंडणी मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात
विनोदवीर सुनील पाल यांचं अपहरण प्रकरण
पाल यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली दाखल
अपहरणकर्त्यांनी 20 लाखांची खंडणी मागितल्याची माहिती
8 लाख रुपयांच्या बदल्यात सुटका केल्याचे सुनील पाल यांचं वक्तव्य
विनोदवीर सुनील पाल यांच्या अपहरणप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. सुनील पाल यांनी दावा केला आहे की, ते उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते, तेव्हा काही अज्ञात लोकांनी त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना एका खोलीत बंद करून २० लाखांची खंडणी मागितली. मात्र, पाल यांनी इतक्या मोठ्या रकमेची पूर्तता करण्यात असमर्थता दर्शवली. अखेरीस, आठ लाख रुपयांच्या बदल्यात त्यांची सुटका करण्यात आली.
पण, सुनील पाल हे सुरक्षितपणे विमानाने मुंबईत परतले आणि त्यांची पत्नी यांनी सांताक्रूझ पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास मेरठ पोलिस करत आहेत. पाल यांच्या पत्नीनेही पोलिसांना सांगितले की, ती चित्रपटसृष्टीत काम करते. ती आणि तिचा मित्र वांद्रे येथे रात्री आठच्या सुमारास त्यांचा अपघातात जखमी झाला.