Shreyas Iyer Century: 10 षटकार अन् 5 चौकारांचा पाऊस! श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात केली गोलंदाजांनी जबरदस्त धुलाई

Shreyas Iyer Century: 10 षटकार अन् 5 चौकारांचा पाऊस! श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात केली गोलंदाजांनी जबरदस्त धुलाई

श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात 10 षटकार आणि 5 चौकारांसह शतक ठोकले, गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला शनिवारी 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी मुंबई आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. वर्ल्डकप 2023 नंतर दुखापतीमुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला आणि त्यानंतर जो श्रेयस अय्यरचा कमबॅक पाहायला मिळत आहे तो अफलातून आहे.

त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा ठोकला आहे. अशीच श्रेयसची एक दमदार कामगिरी विजय हजारे ट्रॉफीसाठी पाहायला मिळाली आहे. शनिवारी 21 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान क गटातील मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला आहे.

या सामन्यात श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी दिसली. यावेळी मुंबईचे कर्णधार पद श्रेयस अय्यरच्या हाती सोपवण्यात आले असून मुंबईचा कर्णधार ३०व्या षटकांत फलंदाजीला आला. मैदानात येताचं अय्यरने पहिल्या 31 बॉलमध्ये अर्धशतक केल पुढे त्याने 207 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत, 55 बॉलचा सामना केला आणि त्यात 114 धावा केल्या.

त्याने ५ चौकार आणि तब्बल १० षटकार खेचले. अय्यरला आयुष म्हात्रेची चांगली साथ मिळाली त्याने अय्यरच्या जोडीने 84 धावांची खेळी केली. यासह शिवम दुबेने 63 धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या बळावर मुंबईने 50 षटकाखेर 382 धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com