India squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा
India squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा; ऑस्ट्रेलिया-A विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीरIndia squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा; ऑस्ट्रेलिया-A विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

India squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा; ऑस्ट्रेलिया-A विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

Team India Squad vs Australia Series : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाचे नेतृत्व; ऑस्ट्रेलिया-A विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरकडे नवी जबाबदारी

16 सप्टेंबरपासून लखनौ येथे हे सामने खेळवले जातील.

23 सप्टेंबरपासून दुसरा सामना एकाना स्टेडियमवर खेळला जाईल.

Team India Squad vs Australia Series : \2025 आशिया कपसाठी संघात न समाविष्ट झाल्यानंतर चर्चेत आलेल्या श्रेयस अय्यरला आता नव्या जबाबदारीची संधी मिळाली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारत-A संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले असून, ऑस्ट्रेलिया-A संघाविरुद्धच्या दोन बहुदिवसीय सामन्यांसाठी त्याची निवड झाली आहे. हे सामने 16 सप्टेंबरपासून लखनौ येथे खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाने शनिवारी (6 सप्टेंबर) हा 15 खेळाडूंचा संघ अधिकृतपणे जाहीर केला.

ध्रुव जुरेलला उपकर्णधारपद; काही नव्या चेहऱ्यांना संधी

यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघात साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे. या तिघांनी अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली छाप पाडली होती. 6 सप्टेंबरपासून लखनौमध्ये भारत-A आणि ऑस्ट्रेलिया-A यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना रंगणार आहे. त्यानंतर, 23 सप्टेंबरपासून दुसरा सामना एकाना स्टेडियमवर खेळला जाईल. पुढील टप्प्यात कानपूर येथे तीन एकदिवसीय सामन्यांचाही समावेश आहे.

राहुल-सिराजची नंतरपासून एंट्री

बीसीसीआयच्या माहितीनुसार, के. एल. राहुल आणि मोहम्मद सिराज हे दोघे दुसऱ्या सामन्यापासून संघात सामील होतील. त्यासाठी दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. अभिमन्यू ईश्वरन, तनुष कोटियन आणि एन. जगदीशन यांच्यासाठी ही मालिका कसोटी संघात प्रवेश करण्याची मोठी संधी ठरणार आहे. हे तिघे गेल्या काही महिन्यांपासून कसोटी संघाच्या दारात आहेत, मात्र अद्याप पदार्पण करायचं बाकी आहे.

देवदत्त पडिक्कलसाठी देखील ही मालिका खूप महत्त्वाची आहे. त्याने भारतासाठी शेवटची कसोटी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. आतापर्यंत त्याला केवळ दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ही मालिका 11 सप्टेंबरपासून होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर लगेच सुरू होणार असून, वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची तयारी मानली जात आहे.

भारत A संघ – ऑस्ट्रेलिया A विरुद्धच्या बहुदिवसीय मालिकेसाठी (2025)

कर्णधार – श्रेयस अय्यर

उपकर्णधार – ध्रुव जुरेल

अभिमन्यू ईश्वरन

एन. जगदीशन

साई सुदर्शन

देवदत्त पडिक्कल

हर्ष दुबे

आयुष बडोनी

नितीश कुमार रेड्डी

तनुष कोटियन

प्रसिद्ध कृष

India squad VS Aus : श्रेयस अय्यरकडे भारत-A संघाची धुरा
Kieron Pollard : 6,6,0,6,6,6,6,6,6… 29 चेंडूत पोलार्डचा रौद्र अवतार! त्याच्या फटकेबाजीने गोलंदाजांची धांदल उडाली
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com