श्रीकांत शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला

श्रीकांत शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगा रुद्रांशही सोबत होता.या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी सोशल मिडियावर हे फोटो शेअर केले आहेत. "जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हा जेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं!

माझा मुलगा रुद्रांश सोबत मोदी यांनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्वीकार केला. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीजी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील विचारपूस करत कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com