Shubhanshu Shukla : अंतराळात जाण्यासाठी शुभांशू शुक्ला यांना पुन्हा वाट पाहावी लागणार ; प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकलले
भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अंतराळात जाण्यासाठी आता अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे,एक्सियम-4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थान अर्थात 'आयएसएस'मध्ये (International Space Station) जाण्यासाठी ते'सध्या सज्ज आहेत . मात्र ही मोहीम एकदा दोनदा नाही तर तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता एक्सियम-4 अवकाशात पाठवण्यासंदर्भाच्या निर्णयाला २२ जून पर्यंत स्थगिती देण्यात आली होती मात्र प्रणोदन खाडीत ऑक्सिजन गळती मुळे तांत्रिक बिघाड झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये एक्सियम-4 अंतराळात झेपावण्यासाठी योग्य नाही त्यामुळे हे मिशन आता पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे.
स्पेस स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आयएसएसच्या सुरक्षेची तपासणी करण्यासाठी ही मोहीम पुढे ढकलण्याचे सांगण्यात आले आहे. हा निर्णय इस्रो आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी घेतला आहे. हवामानातील समस्या आणि फाल्कन 9 रॉकेटमधील द्रव ऑक्सिजन गळतीमुळे मोहिमेत याआधी विलंब झाला होता, आता रशियन झ्वेझ्दा सर्व्हिस मॉड्यूलमधील दाब गळतीमुळे देखील विलंब झाला आहे.
त्यातच आता प्रणोदन खाडीत ऑक्सिजन गळती मुळे तांत्रिक बिघाड झाला आहे.त्यामुळे स्पेस स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करून, सुरक्षेची योग्य तपासणी करून नंतरच या मिशन ची तारीख जाहीर करणार आहेत.या मोहिमेमध्ये नवीन ड्रॅगन अंतराळयान वापरले जाणार आहे. अंतराळ स्थानकाच्या अनेक यंत्रणा या एकमेकांशी संलग्न असून टीमसाठी सर्व तांत्रिक यंत्रणेची योग्य सुरक्षित तपासणी आवश्यक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यामध्ये अमेरिका, भारत, हंगेरी आणि पोलंडचे चे अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला याच्या प्रक्षेपणाची तारीख 29 मे ठरवण्यात आली होती. नंतर 9 आणि 10 जूनपर्यंत स्थगित केली गेली. त्यानंतर ही , 19 जूनपर्यंत ती पुढे ढकलली गेली., आता पुन्हा काही तांत्रिक अडचणींमुळे २२ जून वरून ही हे अभियान पुढे ढकलण्यात आलं आहे.एक्सियम स्पेस नावाची ही एक अमेरिकन कंपनी असून पहिल्यांदाच एखादा भारतीय अंतराळवीर या एक्सियम स्पेसच्या मिशनमध्ये सहभागी असणार आहे.
याआधी राकेश शर्मा हे पहिले भारतीय होते, जे 1984 साली रशियन मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावले होते. या मिशन मध्ये १४ दिवस कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात वास्तव्य करणार आहेत. जर नियोजित तारखेप्रमाणे १० जून ला शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेपावले असते तर २५ किंवा २६ जून च्या सुमारास पुन्हा ते पृथ्वीवर परतले असते. मात्र आता त्यांना अंतराळात झेप घेण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.