Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय

गिलचे इंग्लंडमध्ये दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम
Published by :
Team Lokshahi
Published on

एजबॅस्टनच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल याने आपल्या खेळातून नवा इतिहास रचला आहे. नेतृत्वाच्या पहिल्याच कसोटी मालिकेत, गिलने केवळ नेतृत्वाचाच नाही तर फलंदाजीतही आपली गुणवत्ता सिद्ध करत इंग्लंडमध्ये दुहेरी शतक ठोकण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये कसोटीत दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

गिलने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ३११ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २०४ धावांची भक्कम खेळी साकारली. लीड्सच्या पहिल्या कसोटीत १४७ धावांची झुंजार खेळी साकारलेल्या गिलने इंग्लंडमधील कसोटीत भारतीय कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा मोहम्मद अझरुद्दीन यांच्या १७९ धावांचा विक्रमही मोडीत काढला.

शिवाय, १२५ व्या षटकात सलग तीन चौकार खेचत गिलने आपला स्कोर २२२ पर्यंत नेला आणि सुनील गावसकर यांच्या १९७९ मधील २२१ धावांच्या ऐतिहासिक विक्रमालाही मागे टाकले. गिलचा हा पराक्रम फक्त वैयक्तिक नाही, तर भारतीय क्रिकेटसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

शुभमन गिल कसोटीत दुहेरी शतक करणारा २६ वा भारतीय फलंदाज ठरला असून, ही भारतीय कसोटी इतिहासातील ५० वी दुहेरी शतकी खेळी आहे. विराट कोहली यांच्या ७ दुहेरी शतकांच्या विक्रमाजवळ गिलने आपला पहिला पाऊल टाकले आहे. भारताच्या डावाला बळकट करणाऱ्या गिलच्या खेळीमुळे संपूर्ण संघाला आत्मविश्वास मिळाला असून, सामना सध्या भारताच्या नियंत्रणात आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अशी जबरदस्त खेळी साकारून गिलने आपल्या नेतृत्वाची ठाम छाप जगभरात उमठवली आहे. भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा ठरत असलेला शुभमन गिल, केवळ भविष्यातील आशा नाही, तर वर्तमानातही भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com