Gold Rate : MCX वर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याचा दर 99 हजारांच्या पुढे, चांदीचे दर 1 लाखांच्या पुढे
इराण-इस्त्रायल, युद्धामुळे जागतिक अस्थिरता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. या जागतिक स्तरावरच्या तणावामुळे सोन्याच्या भावात आधी घसरण पाहायला मिळाली होती, मात्र आता सोन्याच्या भावाने देखील उच्चांक दर गाठला आहे. सोन्याचा भावाने वायदे बाजारात (MCX) नवीन विक्रमी स्तर गाठला. 10 ग्रॅम सोन्याचा दर 99185 ते 99200 रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा भाव हा सुरुवातीपासूनच वधारलेला होता.
सध्या सोन्याच्या वायद्याचा उचांक 1 लाख 1 हजार 78 रुपये इतका असून चांदीच्या वायद्याचा उचांक 109748 रुपये इतका आहे. सध्या गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या भावात तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दराचे वायदे 106495 रुपयांवर सुरु झाले. त्यांनतर त्यामध्ये 106630 रुपयांपर्यंत वायदे पोहोचले. मात्र दुसरीकडे सोने घसरताना पाहायला मिळाले. बाजार सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या भावात तेजी होती, मात्र नंतर त्यात घसरण पाहायला मिळाली.
सोन्याच्या दराने 99 हजारांचा टप्पा ओलांडला. सराफ बाजाराच्या इतिहासात दुसऱ्यांदा सोन्याचे दर 99 हजार रुपयांवर गेले आहे. 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव जीएसटी कराची रक्कम धरून 1 लाखांच्या पुढे गेला आहे. 24 कॅरेट मध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दर 101850 रुपये इतका आहे. तर 23 कॅरेट मध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दर 98488 (जीएसटीशिवाय) इतका आहे. याशिवाय चांदीच्या दरात ही वाढ पाहायला मिळाली. चांदीचे दर 20783 रुपयांनी महाग झाले आहेत. चांदीचा दर हा 1 लाख 7 हजारांपर्यंत पोहोचला आहे.