Gold - Silver Rate : अचानक वाढलेल्या दरात मोठी घसरण! सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या...
गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या- चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधला आहे. दिवाळीला अवघे काही दिवस उरल्यापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसली. सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे.
मात्र, ऐन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदीने सोन्यालाही मागे टाकलं होत. सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचला असला तरी चांदीनं 1 लाख 80 हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र सात दिवसांत अचानक वाढलेल्या चांदीच्या दरात आज 33 हजारांनी घसरण झाली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर 8 हजारांनी चांदी गडगडली आहे. चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा 1 लाख 29 हजार रुपयांवर पोहोचले. दोन लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसांत तब्बल 33 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या दरात पाडवाच्या मुहूर्तावर 6200 रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरातही पाच हजार रुपयाची घसरण झाली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, मंगळवारी तर चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी एक लाख 62 हजार रुपयांवर आली. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने 14 ऑक्टोबर रोजी 1 लाख 95 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र, चांदीचे दर कमी होताना दिसत आहेत. सोनी व चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाडव्यानिमित्त सोने व चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

