Fashion Tips : उन्हाळ्यात पुरुषांसाठी साधी आणि आरामदायी फॅशन स्टाईल

Fashion Tips : उन्हाळ्यात पुरुषांसाठी साधी आणि आरामदायी फॅशन स्टाईल

उन्हाळ्यात पुरुषांसाठी आरामदायी आणि स्टायलिश फॅशन टिप्स
Published by :
Team Lokshahi
Published on

उन्हाळा सुरू झाला की फॅशनमध्ये बदल गरजेचा असतो. प्रखर उन्हामुळे कपड्यांची निवड केवळ स्टाईलसाठीच नाही तर आरोग्य आणि आराम यासाठीही महत्त्वाची ठरते. हलकं फॅब्रिक, योग्य रंगसंगती, आणि स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज यांच्या मदतीने पुरुषही समरमध्ये डॅशिंग दिसू शकतात. खाली दिलेल्या टिप्स आणि ट्रेंड्स यावर नजर टाकूया.

१. फॅब्रिकची निवड – कॉटन, लिनन आणि ब्रीदअबल मटेरियल

उन्हाळ्यात कॉटन आणि लिनन हे सर्वोत्तम पर्याय ठरतात. हे फॅब्रिक त्वचेला श्वास घेण्यास मदत करतात आणि घाम लवकर शोषून घेतात. तसेच, यावर्षी बांबू फॅब्रिक आणि कूलटेक पॉलिस्टर ब्लेंड्स सुद्धा ट्रेंडमध्ये आहेत, जे खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहेत.

२. रंगांची निवड – हलकी छटा देईल तुम्हाला शांततेचा अनुभव

उन्हाळ्यात हलके आणि नैसर्गिक रंग जसे की पांढरा, ब्रिज, स्काय ब्लू, पीच, मिंट ग्रीन हे केवळ आरामदायी वाटत नाहीत, तर डोळ्यांना शांतता देतात. पॅस्टेल शेड्स हा २०२५ चा समर ट्रेंड आहे.

३. डिझाईन आणि कपड्यांची शैली

शर्ट्स: क्यूबन कॉलर शर्ट्स, लूज फिट शर्ट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्यावर सूक्ष्म प्रिंट्स असलेले शर्ट्स फारच आकर्षक दिसतात.

टी-शर्ट्स: ओव्हरसाईझ टी-शर्ट्स, सॉलिड रंग, व न्युट्रल टोनचे टीज आजकाल ट्रेंडी आहेत.

शॉर्ट्स आणि ट्राउझर्स: निट फिट कॉटन ट्राउझर्स, लायटवेट कार्गोज आणि सॉफ्ट मटेरियल शॉर्ट्स हे समर लूकला परिपूर्ण करतात.

४. अ‍ॅक्सेसरीज – लूकला शेवटचा टच

सनग्लासेस: UV प्रोटेक्शन असलेले शेड्स निवडावेत. अ‍ॅव्हिएटर्स, वेफेअरर्स हे कधीही स्टाईलिश वाटतात.

हॅट्स व कॅप्स: बकेट हॅट्स, ट्रेंडी बेसबॉल कॅप्स सध्या फॅशनमध्ये आहेत.

वॉच आणि ब्रॅसलट्स: हलक्या मेटल किंवा लेदर स्ट्रॅप्सचे घड्याळं, मिनिमल ब्रॅसलट्स हे लूकमध्ये स्टाईल ऍड ऑन करतात.

५. फूटवेअर – समर स्टाईलसाठी योग्य पायमोजे, लोफर्स, स्लिप-ऑन्स, कॅनव्हास शूज, आणि क्रॉक्स हे समरमधील परिपूर्ण पर्याय आहेत.ऑफिससाठी ब्राउन किंवा टॅन कलरचे मोकासिन्स चांगला पर्याय ठरतात.

६. ग्रूमिंग आणि परफ्यूम्स- उन्हाळ्यात घामामुळे वास येऊ शकतो, त्यामुळे लाइट फ्रेगरन्स परफ्यूम्स – जसे की सिट्रस, अ‍ॅक्वा, किंवा मिंट – वापरणं केव्हाही फायदेशीर ठरतं. तसंच, केसांची निगा, नियमित दाढी किंवा ट्रिम, आणि चेहऱ्याची स्वच्छता आवश्यक आहे.

७. ट्रेंडी ब्रँड्स (इंडियन व इंटरनॅशनल)भारतातील ब्रँड्स: H&M, Louis Philippe, Wrogn, Jack & Jones, Allen Solly, Raymond

८. लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्स: Myntra, Ajio, Tata CLiQ, Amazon Fashion, Flipkart

उन्हाळ्यातील पुरुषांची फॅशन म्हणजे फक्त स्टाईल नसून ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करून देणारी महत्वाची बाब आहे. आरामदायी, तरीही उठावदार लूक मिळवण्यासाठी योग्य फॅब्रिक, योग्य रंग, आणि ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज यांचा समन्वय पुरुषांनी ठेवला पाहिजे. गाईज, यावर्षीच्या समरसाठी स्टाईलिश आणि फ्रेश लुक मिळवण्यासाठी या टिप्स तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com