ओरोस ख्रिश्चनवाडी येथे  एसटी बसखाली पादचारी आल्याने  पादचारी गंभीर जखमी

ओरोस ख्रिश्चनवाडी येथे एसटी बसखाली पादचारी आल्याने पादचारी गंभीर जखमी

हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान झाला.
Published by  :
Sagar Pradhan

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: मुंबई गोवा महामार्गावर ओरोस ख्रिश्चनवाडी चर्च समोर कुडाळ कडून वायंगवडे कडे जाणार्‍या एसटी बसखाली ओरोस येथील एक पादचारी आल्याने धडक बसून अत्यवस्थ झाला आहे. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान झाला.

कुडाळ कडून कसाल मार्गे वायंगवडे कडे जाणारी ही एसटी बस ओरोस येथील चर्चसमोर येतानाच सदर पादचारी महामार्ग ओलांडत होता. अचानक बसच्या समोर आल्यामुळे बसचालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बसची जोरदार धडक बसली. तो रस्त्यावर कोसळत गंभीर जखमी झाला. बेशुद्धावस्थेत त्याला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ती जरा छातीस व डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

एसटी बस क्रमांक आहे एम एच २० बी एल ०८७२ असून बस चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सांगितले नसले तरी ओरोस येथील माजी सरपंच विजय कदम बंधू असल्याचे सांगण्यात येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com