sindhudurg bjp mahayuti seat sharing formula by narayan rane crisis 42 key office bearers submitting mass resignations over zilla parishad elections maharashtra politics
sindhudurg bjp mahayuti seat sharing formula by narayan rane crisis 42 key office bearers submitting mass resignations over zilla parishad elections maharashtra politics

Sindhudurg BJP : सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये बंडखोरीचा वणवा, 43 पदाधिकाऱ्यांचे एकत्रित राजीनामे

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत नुकसान टाळण्यासाठी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कणकवलीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sindhudurg BJP : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत फटका बसला होता. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत नुकसान टाळण्यासाठी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कणकवलीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री नितेश राणे (Nitesh Rane), आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि दोन्ही पक्षांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

मात्र जागावाटपाची घोषणा होताच भाजपमध्ये असंतोष उफाळून आला. ओरोस भागातून पक्षाला मोठा धक्का बसला असून तब्बल 43 पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले आहेत. मंडळ अध्यक्ष आनंद सावंत यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक जिल्हा व मंडळस्तरीय कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या घडामोडींमुळे भाजपसमोर नवा राजकीय प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे अंतर्गत नाराजी वाढताना दिसत आहे. सिंधुदुर्गमध्ये ही बंडखोरी महायुतीसाठी किती महाग ठरणार, हे येत्या निवडणुकांत स्पष्ट होणार आहे.

थोडक्यात

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आधीच फटका बसला होता.

  2. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत नुकसान टाळण्यासाठी भाजप नेते नारायण राणे यांनी कणकवलीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.

  3. बैठकीला मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि दोन्ही पक्षांचे जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com