साहेब..आमच्या शाळेत जाणारा रस्ता व पुलाचा प्रश्न सोडवा! विद्यार्थीनीची मागणी

साहेब..आमच्या शाळेत जाणारा रस्ता व पुलाचा प्रश्न सोडवा! विद्यार्थीनीची मागणी

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विकासाची विविध कामे करण्यात येत आहेत. पण, अजूनही ग्रामाीण भागातील अनेक गावे, वस्त्या मुलभूत सुविधांपासून दुर आहेत.
Published by :
shweta walge

भूपेश बारंगे, वर्धा : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. विकासाची विविध कामे करण्यात येत आहेत. पण, अजूनही ग्रामाीण भागातील अनेक गावे, वस्त्या मुलभूत सुविधांपासून दुर आहेत. रस्ते, पुल नसल्याने आवागमनास अडथळे निर्माण होतात. पावसाळ्यात तर संपर्कच तुटतो. अशीच परिस्थिती तालुक्यातील सुसुंद्रा येथील हेटी भागात आहे. हेटीपासून सुसुंद्राला जाण्यासाठी पुलही नाही आणि पक्का रस्ताही नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत येथील विद्यार्थी शाळेत जाण्यापासून वंचित राहतात. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच आरोग्यविषय समस्यांनाही सामोरे जावे लागते. प्रकृती बिघडल्यास तातडीच्या प्रसंगी रुग्णालयात नेताना अडचणी येत असून शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत ही समस्या सोडविण्याची गरज आहे.

कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा गावामध्ये हेटीचा समावेश आहे. सुसुंद्रापासून हेटीपर्यंतचे अंतर साधारण दोन किलोमीटरचे आहे. येथील लोकसंख्या शंभरच्या वर आहे. हेटीवासीयांना दैनंदिन कामकाजाकरिता सुसुंद्रा येथूनच आवागमन करावे लागते. गावाला जोडणारा दुसरा रस्ता नाहीच. हेटीच्या पुढे गेल्यानंतर नदी असून पलिकडे नागपूर जिल्हा आहे. हेटीपासून सुसुंद्रापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या अंतरात दोन नाले आहेत. दोन्ही नाल्यांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. रस्ता तर नावालाही नाहीच. कच्च्या ओबडधोबड रस्त्याने आवागमन करताना सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. पायदळ चालणेही येथे कठीण ठरते. दळण, किराणा, शाळा, कॉलेज, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुसुंंद्रा येथे येण्याशिवाय पर्याय नाही. कुठल्या गावाला जायचे असले तरीही सुसुंद्राला यावे लागते. पण, सुसुंद्राला येण्यासाठी दोन किलोमीटरच्या अंतरात पक्का रस्ता नाही. नाल्यावर पुलही नाही. त्यामुळे सर्वांचीच अडचण होते. पावसाळ्यात तर या अडचणीत भर पडते. येथील नाल्यावर पुलाची निर्मिती करत रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसाळ्यात येथील परिस्थिती बिकट असते. नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत येथील विद्यार्थी शाळेत जावू शकत नाहीत. या कालावधीत मुलांना शाळेत पाठवण्याची कुणी हिंमतही करू शकत नाही. हेटी येथील १५ ते १७ विद्यार्थी सुसुंद्रा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रवेशित आहेत. काही विद्यार्थी माध्यमिक शाळेत तर काही कारंजा शहरात कॉलेजला प्रवेशित आहेत. पावसाळयात येथील विद्यार्थी शाळा, कॉलेजला जाऊ शकत नसल्यान शैक्षणिक नुकसान होते.

रस्त्याची परिस्थिती बिकट असून येथे वाहने जाण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला रुगणालयात कसे न्यावे, असा प्रश्न निर्माण होतो. अचानक प्रकृती बिघडल्यास येथील नागरिकांना कठीण प्रसंगांना तोंड देत रुग्णालयात जावे लागते.

शेतीकरिता लागणारे खते, बियाणे, औषधी आदी साहित्य पावसाळ्यापूर्वीच नेऊन ठेवावे लागते. पाऊस सुरू असल्यास आणि नाल्याला पूर असल्यास आवागमन ठप्प होते. अशा स्थितीत मोठ्या अडचणी निर्माण होतात.

प्रसुती असल्यास महिलेस दोन -तीन महिन्यापूर्वीच नातलगाच्या गावी न्यावे लागते. रस्ता आणि पुलाअभावी येथे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शाळेत येताना रस्ता खराब आहे. त्यात तीन नाल्याना कधी पूर येते,त्यात पाणी राहते.त्यामुळे शाळेत जाताना पाण्यातून जावे लागते.रस्त्याने चिखल तुटवडत जावे लागते.नदीला पूर आला किंवा जास्त पाणी राहिले तर आम्ही शाळेत जातच नाही.

साहेब..आमच्या शाळेत जाणारा रस्ता व पुलाचा प्रश्न सोडवा! विद्यार्थीनीची मागणी
कोल्हापुरात शिक्षण विभागाची अब्रू वेशीवर; इयत्ता चौथीच्या मुलींशी शिक्षकाचे असभ्य वर्तन

सन्नि येसनसुरे विद्यार्थी सुसुंद्रा

सुसुंद्रा - हेटी गावातील नागरिकांना कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गावाला जोडणारा रस्ता अद्यापपर्यंत बनला नसून गावातील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गावात गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागतो. शेतीसाहित्य न्यायला अडचण होते. मुलांना शाळेत जायची अडचण आहे. कित्येक वर्षांपासून नागरी सुविधांपासून सुसुंद्रा हेटी वस्ती वंचित आहे. येथे रस्ता, पुलाची निर्मिती करण्याची गरज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com