Walmik Karad : वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून कोर्टामध्ये अर्ज
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून कोर्टामध्ये अर्ज करण्यात आला आहे. वाल्मिक कराडची राज्यभर असलेली कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती त्याचा नावे आणि पत्नी मंजिली कराड त्याचबरोबर दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि मुलगा गणेश यांच्या नावावर आहे. आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती राज्याच्या बाहेर देखील आहे. याच पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज केला याची सर्व चौकशी होणार आहे.
वाल्मिक कराडची संपत्ती-
केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला किंमत 1 कोटी 69 लाख रुपये
बीडच्या दगडवाडी मध्ये शेतजमीन किंमत 48 लाख 26 हजार रुपये
मौजे तडोळी येथे 12 एकर शेत जमीन 20 लाख 27 हजार रुपये
परळी रोडवर अंबाजोगाई 380 चौ. मी. बांधकाम
अंबाजोगाईमध्ये 419 चौ.मी बांधकाम किंमत कोट्यावधी रुपये
बीडच्या दगडवाडी येथे स्टोन क्रेशर युनिट
दगडवाडी गावात 48 लाखांची शेतजमीन
परळीतील वडगावात साडेचार एकर शेतजमीन किंमत 13 लाख रुपये
वडगावात आणखी एक प्लॉट किंमत दीड लाख रुपये.
बीडच्या सिरसाळा गावात 581 चौ.मी खुला प्लॉट किंमत साडेसात लाख रुपये