Nitin Gadkari on Air Bags
Nitin Gadkari on Air BagsTeam Lokshahi

नितीन गडकरी यांचं नवं ट्वीट; एअरबॅग्जसंदर्भात मोठी घोषणा

किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

सर्व प्रवासी कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. सरकारने याआधी 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची योजना आखली होती. आता या निर्णयामध्ये बदल करून सर्वच प्रवासी कार्समध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, हा निर्णय अंमलात आणण्यासाठी 1 वर्षाचा काळ वाढवला देखील आहे. ही माहिती नितीन गडकरी यांनी ट्वीट करून दिली आहे.

Nitin Gadkari on Air Bags
राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या वादापासून दूरच; दसऱ्यादिवशी असणार पुण्यात

नितीन गडकरी यांचं ट्वीट:

"मोटार वाहनांतून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांची किंमत आणि प्रकार विचारात न घेता त्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे." असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

"ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, 01 ऑक्टोबर 2023 पासून पॅसेंजर कार्समध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com