Air India Flight Accident : एअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी; जाणून घ्या...

Air India Flight Accident : एअर इंडिया विमान अपघातात महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी; जाणून घ्या...

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिगो विमानाच्या अपघातात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 जण विमानातील क्रु मेंबर्स होते, तर 3 जण हे प्रवासी होते.
Published by :
Prachi Nate
Published on

आज 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी एअर इंडियाच्या Dreamliner 789 या विमानाने उड्डाण घेतलं आणि टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटातच विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विमानामध्ये 12 क्रु मेंबर 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती DGCAकडून मिळाली आहे. विमान क्रॅश होण्याआधी वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला होता. अपघातग्रस्त विमानातून आतापर्यंत 100 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून विमानात 242 प्रवासी होते.

सुचना मिळेपर्यंत अहमदाबाद एअरपोर्ट बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर या अपघातात महाराष्ट्रातील देखील 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. यावेळी एअर इंडियाच्या 12 क्रू मेंबर्सपैकी 3 जण, तर 3 जण प्रवासी हे महाराष्ट्रातील होते. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला क्रू मेंबर्स तसेच विमानातील कर्मचारी होत्या, तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जण प्रवासी होते. यांचा 6 जणांचा एअर इंडिगो विमानाच्या भीषण अपघातात मृत्यु झाला आहे.

यातील अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक असून त्या त्यांच्या सख्ख्या भावाच्या पत्नी होत्या. त्यामुळे आता या घटनेमुळे तटकरे कुटुंबातही दुःखाच वातावरण निर्माण झालं आहे. याव्यतिरिक्त या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते, त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत या विमानात 230 प्रवासी,12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. यावेळी विमानात 169 भारतीय,52 ब्रिटीश प्रवासी होते, तर 7 पोर्तुगीज आणि एका कॅनडियन प्रवाशाचाही समावेश होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com