Astronomical events of 2025
Astronomical events of 2025

Sky Watching Calender 2025 | खगोलप्रेमींना नव्यावर्षात मोठी पर्वणी, चार ग्रहणे, 11 उल्कावर्षाव

खगोलप्रेमींनी पुढील वर्ष खुणावत आहे. नववर्षात 11 उल्कावर्षाव होणार आहेत. तर ४ ग्रहणे होणार आहेत.
Published by :
Published on

येणारं नवं वर्ष खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी घेऊन येणार आहे. २०२५ सालामध्ये खगोलीय घटनांची रेलचेल असणार आहे. अवकाशामध्ये दररोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. खगोलप्रेमी या घटना टिपतात, त्यांचा अभ्यास करतात. सरत्या वर्षाला निरोप देताना आता खगोलप्रेमींनी पुढील वर्ष खुणावत आहे. नववर्षात 11 उल्कावर्षाव होणार आहेत. तर ४ ग्रहणे होणार आहेत.

२०२५ मध्ये कोणत्या खास घटना घडणार?

आगामी २०२५ वर्षात दोन चंद्रग्रहणे, दोन सूर्यग्रहणे, ११ उल्कावर्षाव, सूपरमून, धूमकेतू, ग्रह-ताऱ्यांची युती-प्रतियुती, ग्रह दर्शन, त्यांचे उदयास्त, राशी भ्रमण अशा अनेक खगोलीय घटनांची मेजवानी आकाश निरीक्षणप्रेमींना मिळणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली आहे. तुटणाऱ्या ताऱ्यांच्या स्वरूपात दिसणारा विविधरंगी उल्कावर्षाव वर्षारंभी ३ जानेवारीला होणार आहे.

ग्रहणं

चंद्रग्रहण

  • १४ मार्च रोजी वर्षातले पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.

  • ७ सप्टेंबर रोजी दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असून साडेतीन तास हे ग्रहण पाहता येणार आहे.

सूर्यग्रहण

  • २९ मार्च रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असून भारतातून हे पाहता येणार नाही.

  • २१ सप्टेंबर रोजी दुसरं सूर्यग्रहण होणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असून भारतातून हे पाहता येणार नाही.

उल्कावर्षाव

  1. चतुर्भूज उल्कावर्षाव Quadrantid meteor shower: वर्षाची सुरुवातच उल्कावर्षावाने होणार आहे. २ आणि ३ जानेवारीच्या मध्यरात्री हा उल्कावर्षाव पाहता येणार आहे. १६ जानेवारीपर्यंत हा उल्कावर्षाव असणार आहे.

  2. Lyrids उल्कावर्षाव: १५-३० एप्रिल दरम्यान हा उल्कावर्षाव होतो. २२ एप्रिल रोजी मध्यरात्री हा उल्कावर्षाव पाहता येणार आहे. मात्र, हा उल्कावर्षाव भारतातून पाहता येत नाही. कारण या कालावधीत भारतात पावसाच्या ढगाने आकाश व्यापलेले असते.

  3. eta Aquariids उल्कावर्षाव: २० एप्रिल ते २१ मे दरम्यान हा उल्कावर्षाव होतो. ३-४ मे च्या मध्यरात्री या उल्कावर्षावाचं पीक पॉईंट असणार आहे.

  4. Southern delta Aquariids उल्कावर्षाव: १८ जुलै ते १२ ऑगस्ट (२९-३० जुलै मध्यरात्री पीक पॉईंट)

  5. alpha Capricornids उल्कावर्षाव: १२ जुलै ते १२ ऑगस्ट (२९-३० जुलै मध्यरात्री पीक पॉईंट)

  6. Perseids उल्कावर्षाव: १७ जुलै ते २३ ऑगस्ट (१२-१३ ऑगस्ट मध्यरात्री पीक पॉईंट)

  7. Southern Taurids उल्कावर्षाव: १० सप्टेंबर ते २० नोव्हेंबर (९-१० ऑक्टोबर मध्यरात्री पीक पॉईंट)

  8. Orionids उल्कावर्षाव: २ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर (२२-२३ ऑक्टोबर मध्यरात्री पीक पॉईंट)

  9. Northern Taurids उल्कावर्षाव: १३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर (८-९ नोव्हेंबर मध्यरात्री पीक पॉईंट)

  10. Leonids उल्कावर्षाव: ३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर (१६-१७ नोव्हेंबर मध्यरात्री पीक पॉईंट)

  11. Geminids उल्कावर्षाव: १ डिसेंबर ते २१ डिसेंबर (१२-१३ डिसेंबर मध्यरात्री पीक पॉईंट)

  12. Ursids उल्कावर्षाव: १६ ते २६ डिसेंबर (२१-२२ डिसेंबर मध्यरात्री पीक पॉईंट)

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com