Air India
Air India Team Lokshahi

उड्डाणापूर्वीच एअर इंडियाच्या विमानातून धूर, मोठा अनर्थ टळला

विमानातील 145 प्रवासी सुखरुप
Published by :
Sagar Pradhan
Published on

मस्कत येथून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जंसी लँडींग करण्यात आलं आहे. विमानातून अचानक धूर निघत असल्यामुळे या विमानाची लँडिंग करण्यात आली आहे. एयर इंडिया एक्सप्रेस IX-442, VT-AXZ या विमानात 141 प्रवासी होते. उड्डाणापूर्वी अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. मंगळवारी सकाळ ही घटना घडली आहे.

Air India
सौरव गांगुली, जय शाह यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

एअर इंडियाच्या विमानातून धूर कशामुळे निघाला याचा तपास सध्या सुरु आहे. प्रवासांसोबत मोठा अनर्थ होता होता टळला आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या अगोदर 25 ऑगस्टला देखील सिडनी येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.

उड्डाणाआधी झाली होती विमानाची तपासणी

विमान उड्डाणाच्या आधी सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली होती. आयसोलेशन मॅन्युल, ऑन-ग्राउंड इंजिनियरिंगची तपासणी करण्यात आली होती. इंजिन ग्राउंड, रन इंजिन आणि ऑक्झिलरी पॉवर युनिट (APU) या दोन्हींच्या ऑपरेशनसह सर्व तपासण्या केल्या गेल्या. तपासणीवेळी कुठूनही धूर निघत नव्हता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com