Weather Update : एकीकडे बर्फवृष्टी तर दुसरीकडे मुसळधार पाऊस! 10  राज्यांमध्ये हवामान अस्ताव्यस्त

Weather Update : एकीकडे बर्फवृष्टी तर दुसरीकडे मुसळधार पाऊस! 10 राज्यांमध्ये हवामान अस्ताव्यस्त

अनेक ठिकाणी हिवाळा सुरु झाला असून महाराष्ट्रात अजून देखील पावसाळी वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे 10 राज्यांमध्ये हवामान बिघडल्याचे दृश्य आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचं दमदार आगमन झालं आहे, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, आता आयएमडीचा नवा अंदाज समोर आला आहे. अनेक ठिकाणी हिवाळा सुरु झाला असून महाराष्ट्रात अजून देखील पावसाळी वारे वाहताना दिसत आहेत.

त्याचसोबत उत्तर भारतात हिवाळा सुरु झाला असून पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशाच्या वरच्या भागात बर्फवृष्टी होईल. त्यामुळे 10 राज्यांमध्ये हवामान बिघडल्याचे दृश्य आहे. डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे मैदानी भागात तापमानात झपाट्याने घट होण्याची शक्यता वर्तावली असून दिल्लीत या दिवसांत प्रदूषणाचा फटका अधिक बसत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हरियाणा आणि पंजाबमध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच ईशान्येसह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी होण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com