... म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला; निळू फुलेंची लेक गार्गी फुलेंची प्रतिक्रिया
Admin

... म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला; निळू फुलेंची लेक गार्गी फुलेंची प्रतिक्रिया

ज्येष्ठ सिने अभिनेते निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ज्येष्ठ सिने अभिनेते निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे. आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

याच पार्श्वभूमीवर गार्गी फुले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. गार्गी फुले म्हणाल्या की, राष्ट्रवादीची विचारसरणी आणि तत्वे आहेत. ती माझी स्वत:ची आणि बाबांची तत्वे होती. त्या तत्वांना न्याय कोण देऊ शकेल. तर राष्ट्रवादी. किनाऱ्यावर बसून गोष्टी बघू नये प्रवाहात उतरुन काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्विकारेन. असे गार्गी फुले म्हणाल्या.

... म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला; निळू फुलेंची लेक गार्गी फुलेंची प्रतिक्रिया
अभिनेते निळू फुलेंची लेक गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com