Ankita Prabhu Walawalkar Supports Pranit More : "'आता पाहूया कोण गावी परत जातंय...'!" – कोकण हार्टेड गर्लने बसीरला सुनावलं
Ankita Prabhu Walawalkar Supports Pranit More : गेम आणि भांडण यांचा विषय सुरु झाला तरी आठवत ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस १९' व्या सीझनची चर्चा सर्वत्र होते आहे. या खेळामध्ये अनेक मोठंमोठे स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात एक मराठमोळा स्पर्धक, प्रणित मोरे, सहभागी झाला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रणित मोरेच्या समर्थनासाठी अनेक इन्फ्लुएन्सर्स, मराठी चाहते आणि एक्स बिग बॉस स्पर्धक सक्रिय झाले आहेत. बिग बॉसच्या अलीकडच्या भागात प्रणित आणि अमाल मलिक या दोघांमध्ये वाद झाला.
खरंतर, भांडण प्रणित आणि अमाल यांचं होतं, पण यामध्ये बसीर अलीनं हस्तक्षेप केला आणि दोघांच्या वादातमध्ये पडला. दरम्यान हा वाद आणखीन वाढला आणि बसीर आणि प्रणित यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर मात्र त्याचे पडसाद दोघांच्या फॉलोवर्समध्येही दिसू लागले आणि दोघांच्या फॉलोवर्समध्येही संघर्ष सुरू झाला.त्या वादामध्ये आता बिग बॉस मराठीचे स्पर्धकही सामील झाले आहेत. कोल्हापूरचे डीपी दादानं एक व्हिडीओ बनवला आणि आता प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हिनं एक व्हिडीओ शेअर करून प्रणित मोरेच्या बाजूने समर्थन व्यक्त केलं आहे.
अंकिता व्हिडीओमध्ये काय म्हणाली?
अंकितानं बिग बॉसच्या घरातील बसीर आणि प्रणित यांचं भांडण असलेली एक क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये दोघांमधील वाद वाढून बसीर रागाच्या अवस्थेत प्रणितला "गो बॅक टू युअर व्हिलेज..." असं म्हणतो. अंकिता याच वाक्यावर ती हसून प्रतिक्रिया देते आणि म्हणते, "हा म्हणतोय 'गो बॅक टू युअर व्हिलेज', जणू काही तो मोठ्या शहरातून आलेला आहे. आम्ही गावातून आलोय... आमच्या गावातील लोक प्रणितला खूप वोट देतील आणि त्यासोबतच त्याला कपडे पाठवतील..."
अंकिता पुढे म्हणते, "आता तेच वेळ आहे, अख्खा महाराष्ट्र एकत्र येऊन वोट करावा... सगळ्या मराठी लोकांनी, गावातील लोकांनी... आता पाहूया कोण गावी परत जातंय... प्रणितला आतच ठेवावं, बाहेर आल्यानंतर त्याचं काही करायचं नाही."
अंकिता आणखी एक क्लिप शेअर करते आणि म्हणते, "बिग बॉसच्या घरात असताना काय अनुभव येतो, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाही माहित असेल. प्रणितचीही तीच अवस्था आहे. आम्ही तिथे जाऊन काही मुद्देसुद वाद निर्माण करत नाही. आपल्या भावाचा पूर्ण सपोर्ट करा, त्याला भरपूर वोट द्या..." नंतर अंकिता इतरांना विचारते, "कुणाला वोट करायचंय?" आणि त्यावर तो व्यक्ती उत्तर देतो, "प्रणितला वोट करायचंय."