Dr.Shirish Valsangkar : जीवन संपवलेल्या डॉक्टरांच्या मृत्यूचे गूढ उकलले, 'त्या' महिलेमुळे...

डॉक्टरांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी एक सुसाइड नोट मिळाली आहे.
Published by :
Shamal Sawant

सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. इतक्या मोठ्या डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्नदेखील उपस्थित केला गेला. याप्रकरणी अनेक चर्चादेखील रंगल्या आहेत. अशातच आता डॉक्टरांच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. डॉक्टरांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी एक सुसाइड नोट मिळाली आहे. या सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. एका महिलेच्या त्रासाला कंटाळून वळसंगकरांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

ज्या महिलेला आपण आयुष्यात मोठं केलं. रुग्णालय प्रशासनाची सूत्रं हाती दिली. त्याच महिलेने आपल्यावर घाणेरडे आरोप केले. हे आता आपल्याला सहन होत नाही, असं चिठ्ठीत लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com