Ajit Pawar : "काहींच्या बाबतीत माझं मीठ अळणी..." अजित पवारांचा महेश लांडगेंचं नाव न घेता टोला
Ajit Pawar On Mahesh landage : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्या शाब्दिक वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोमणा मारला होता. आता अजित पवारांनी महेश लांडगेंचं नाव न घेता टोला मारला आहे.
यावेळी ते म्हणाले की, इथल्या महानगरपालिकेत चहाचा मींदा देखील नाही, आता पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर कर्ज आहे. 9 हजार कोटी च बजेट असताना कर्ज का काढलं?.मी अनेकांना उमेदवारी देऊन नगरसेवक केलं.काहींच्या बाबत माझ मीठ अळणी निघालं. मला आता पश्चाताप होतोय.महेश लांडग काय होतास तू, काय झालास? भंगार गाड्या इकडून तिकडे घेऊन जायचा. (महेश लांडगे यांचं नाव न घेता टोला दिला आहे.
थोडक्यात
'काय होतास तू, काय झालास तू ?'
..काहींच्या बाबतीत माझं मीठ अळणी निघालं'..
'मला आता पश्चाताप होतोय'..
महेश लांडगेंचं नाव न घेता अजित पवारांना टोला

