नेहा कक्करची बहिण सोनीनं केलं स्पष्ट, 'मी आता त्यांची बहीण नाही'; व्हायरल पोस्टमुळे खळबळ
बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी गायलेली सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिच्या बहिणीने एक धक्कादायक पोस्ट करून सिनेसृष्टीत खळबळ माजवली आहे. नेहाची बहिण सोनी कक्कर हिने 'मी आता त्यांनी बहिण नाही', अशा आशयाची पोस्ट ट्विटरवर केली आहे. यात तिने नेहासह त्यांचा भाऊ टोनी यालाही उद्देशून ही पोस्ट केली आहे.
सोनू कक्कर, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक भावंडे आहेत. सोनू 9 एप्रिल रोजी टोनीच्या वाढदिवसाच्या समारंभात अनुपस्थित राहिली होती. त्यानंतर लगेचच तिची अशी पोस्ट समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोनूच्या सोशल मीडियावरुन ही पोस्ट हटवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी गायक अमाल मलिकने जाहीर केले होते की तो त्याच्या कुटुंबीयांशी असणारे सर्व वैयक्तिक संबंध तोडून टाकणार आहे, सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर त्याने काही तासाने ही पोस्ट डिलीट केली होती.
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सोनूने अशी पोस्ट शेअर केली होती की, 'तुम्हाला सर्वांना कळवताना खूप दुःख होत आहे की मी आता दोन प्रतिभावान सुपरस्टार, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. माझा हा निर्णय भावनिक वेदनांमधून आला आहे आणि आज मी खरोखर निराश आहे.'