Nagpur | Supriya Sule : '8 महिन्यांपासून शिवभोजन थाळी चालक महिलांना पगार नाही'; सुळेंचं वक्तव्य
आज शिवभोजन संघटनांच्या महिला संचालकांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवभोजन थाळीचे पैसे आठ महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे शिवभोजन थाळी चालवणाऱ्या महिला आत्महत्या करू का? असं विचारत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर पुण्यात गुन्हेगारी वाढतेय हे दुर्दैव असल्याचं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "शिव भोजन संचालक संघटनाचे महिला संचालक भेटल्यात.. शिव भोजन थाळीचे पैसे आठ महिन्यापासून मिळालेले नाही, चालवणाऱ्या महिला आत्महत्या करू का अस विचारत आहेय...अतिशय गंभीर ही बाब आहे. आज रात्री मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री यांना सगळ्या संदर्भात पत्र देणार आहे"
तसेच पुढे घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे."
"इतकी सुरक्षा व्यवस्था असतांना त्यातून पासपोर्ट मिळू शकतो, इमिग्रेशन होत असताना डिजी यात्रेचं असताना धोकादायक आणि चिंताजनक आहे....चौकशी होईलच केंद्रीय मंत्री अमित शहा पर्यंत नेऊन चौकशी झाली पाहिजे.... पासपोर्ट केंद्र सरकार देतात, हे त्यांना कळलं पाहिजे... महाराष्ट्रात किती धक्कादायक घटना झाली आहे, राज्याच्या सुरक्षेचा विषय आहे".