Shrikant Shinde : 'निर्माण करू शकत नसल्याने तोडफोडीची भाषा',श्रीकांत शिंदेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
थोडक्यात
राज्यातील राजकारणात पुन्हा तापमान वाढलं आहे.
मनसे प्रमुखांच्या या आक्रमक भूमिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर देत तीव्र टीका केली.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर देत तीव्र टीका केली.
Shrikant Shinde On Raj Thackeray : राज्यातील राजकारणात पुन्हा तापमान वाढलं आहे. महायुती सरकारच्या पर्यटन विभागाने शिवकालीन गडकिल्ल्यांवर प्रस्तावित 'नमो केंद्रा'विरोधात राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याने निर्माण झालेल्या तणावाला आता नवीन वळण मिळाले आहे. मनसे प्रमुखांच्या या आक्रमक भूमिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर देत तीव्र टीका केली असून या वक्तव्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय संदेश दिला गेल्याची चर्चा रंगली आहे.
"निर्माण करू शकत नसल्याने तोडफोडीची भाषा"
राज ठाकरे यांनी ‘नमो केंद्र फोडून टाका’ असा इशारा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी कोणतीही आडपडदा न ठेवता मनसेवर हल्लाबोल केला. त्यांच्या शब्दांत, “हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय?”
गडकिल्ल्यांवर पर्यटक सुविधा, माहिती केंद्र आणि पर्यटन विकासाचा हेतू असल्याचे सांगत त्यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
गडकिल्ले, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी महायुती सरकारने पावले उचलली असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी विरोध आणि धमक्यांचा मार्ग स्वीकारणे, ही राज ठाकरे यांची राजकीय घसरण दर्शवणारी भूमिका असल्याचे त्यांनी सूचित केले.
"कधीकाळी मोदींचे कौतुक, आज निंदा"
राज ठाकरे यांनी पूर्वी नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते, याची आठवण करून देत श्रीकांत शिंदे म्हणाले की, तेव्हाच्या स्तुती आणि आजच्या टीकेतला विरोधाभासच राजकारणातील अस्थिरता दाखवतो. “नमो केंद्र फोडण्यासाठी उकळी येते, पण विकासकामांसाठी ठोस पर्याय नाही,” अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरेही निशाण्यावर
फक्त राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी थेट टीका केली.
“आता शेतकरी यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत आहेत. कारण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही. लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिला नाही,” असे ते म्हणाले.
महापुरात महायुती सरकारने तातडीने ३८ हजार कोटींचा मदतपॅकेज दिले असल्याचे सांगत, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘निर्णयशून्यता’ त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
निवडणुका आणि युती"वरिष्ठ ठरवतील"
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता,
“हा कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याचा उत्सव असतो. महायुतीचा प्रयत्न राहील; मात्र जिथे कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असतील, तिथे वरिष्ठ निर्णय घेतील,” असा संतुलित सूर त्यांनी लावला.

