Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : विदर्भात मोठ्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढणार – मुख्यमंत्री

हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Chief Minister Devendra Fadnavis ) हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली. एकूण झालेल्या मोठ्या गुंतवणुकीपैकी सुमारे ५ लाख कोटी रुपये केवळ विदर्भात आले असून करार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास एक तृतीयांश वाटा महाराष्ट्राकडे आहे.

विदर्भाच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गडचिरोली हा आता गुंतवणुकीचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे. या भागात वेगाने उद्योग येत असून रोजगाराच्या संधी वाढत आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पात सध्या ३१ कंपन्या कार्यरत असून आणखी २२ कंपन्या लवकरच सुरू होणार आहेत. आयटी क्षेत्रातील देशातील मोठ्या कंपन्यांची उपस्थिती मिहानमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दीड लाखांच्या आसपास रोजगार निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. मिहान विमानतळाच्या विस्ताराचे कामही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाश व संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली असून त्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये विदर्भ देशात आघाडीवर येईल. तसेच इलेक्ट्रिक वाहन उद्योगामुळे मराठवाडा भागातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com