Supriya Sule On Maratha Andolan : आंदोलनाबाबत सुप्रिया सुळेंची सरकारकडे 'ही' महत्त्वाची मागणी

सुप्रिया सुळे: मराठा आंदोलनावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी.
Published by :
Riddhi Vanne

Supriya Sule On Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे काल आझाद मैदानावर पोहोचल्या आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र प्रकृती खालावल्याने जरांगे यांनी संवाद टाळला. यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, एकदिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले आणि २४ तासांत निर्णय घ्यावा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com