ताज्या बातम्या
आठवड्याच्या मध्येच पश्चिम रेल्वेकडून विशेष ब्लॉक; पाहा कुठे
आज 16 ऑगस्ट बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.
आज 16 ऑगस्ट बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या काही प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत. डहाणू रोड रेल्वे स्थानकात बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे.
सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी निघणारी डहाणू रोड ते विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे . सकाळी 8 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. 6 भूज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटं उशिरानं धावेल. तर, गाडी क्रमांक 22930 वडोदरा-डहाणू रोड एक्स्प्रेस तब्बल 45 मिनिटं उशिरानं धावणार आहे.