Mumbai Railway Latest Update
Mumbai Railway Latest Update

Railway Megablock: रेल्वे प्रवाशांना दिलासा! अखेर CSMT रेल्वे स्थानकातील विशेष मेगाब्लॉक संपला, ठाण्यातही रेल्वेसेवा पूर्ववत

गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, हा मेगाब्लॉक आता संपला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.
Published by :

Central Railway Mega Block Update : गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, हा मेगाब्लॉक आता संपला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. तसच ठाण्यातील लोकल सेवाही पूर्ववत झाली आहे. फलाट क्रमांक ५ वरील रेल्वे सेवा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेचा सीएसएमटी येथील ३६ तासांचा विशेष मेगा ब्लॉक संपला आहे. सीएसएमटी येथून रवाना होणारी पहिली लोकल ट्रेन सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे दाखल झाली आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेने ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. आता रेल्वेने वेळेत काम पूर्ण करून हा मेगा ब्लॉक संपवला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com