Megablock: मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक

Megablock: मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री 12:30 पासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा उपलब्ध नसेल.

गेल्या 2 वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आता या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटीदरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील.

हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस, अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल या रेल्वे गाड्या दादरपर्यंत धावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com