Special Report Kolhapur Drain Cleaning: अपूर्ण नालेसफाई, कोल्हापुरात महापूर येणार?; आता स्पेशल रिपोर्ट वाचा क्लिक करा
कोल्हापुरातील नाले हाच गाळ काढण्यासाठी महापालिका दोन महिने प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे जेसीबी किंवा पोकलॅन मशिन नाल्यात उतरू शकत नाहीत. काही ठिकाणी तर माणसानेही गाळ काढणे अशक्य झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही या ठिकाणांची साफसफाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि व्हिनस कॉर्नर परिसरात काही प्रमाणात गाळ काढण्यात आला असला तरी सुतार मळा आणि व्हिनस कॉर्नरजवळ अतिक्रमणांमुळे यंत्रसामग्री पोहोचू शकत नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर तळी साचून कोल्हापूर तुंबल्याचे दृश्य पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूरातील स्थानिक नागरिकांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस म्हणाले की, "दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने यंदा अधिक यंत्रसामग्री लावत नालेसफाई सुरू आहे. त्यातच 15 हजार टन गाळ काढण्याचा दावा महापालिकेने केलाय. त्याचप्रमाणे उर्वरित वीस ते तीस टक्के नालेसफाई पुढील आठ ते १० दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे."
"एकूणच पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या नाल्यांमधील गाळ काहीसा निघाला आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पद्धतीने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उर्वरित गाळ काढण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं राहिलंय. याचाच अर्थ या सगळ्या अडचणींमुळे संपूर्ण नालेसफाई झाली नाहीत तर कोल्हापूरचा महापूर अटळ आहे." असे मंजूलक्ष्मी, महापालिका आयुक्त यांनी म्हटले आहे.