Special Report On Beed Hospital : 5 वर्ष वीजच नाही, तरी 90 हजारांचे बिल; बीड रुग्णालयाचा भोंगळ कारभार
महाराष्ट्रात एक असं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जे जगावेगळं आहे. या आरोग्य केंद्राची उभारणी पाच वर्षांपूर्वी झाली. भलीमोठी इमारत विस्तीर्ण जागा असं असूनही इथं विजेचा पत्ताच नाही. महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून ही इमारत उभारली गेली तेव्हापासून आजतायगायत इथं विजेचा मीटरच बसवला गेलेला नाही. त्यामुळे इथल्या लाईट्स, पंख्यांसह आरोग्याच्या सगळ्या यंत्रणा बंद आहेत. असं असलं तरी, धक्कादायक म्हणजे या आरोग्य केंद्राला लाईटचं बिल आलं आहे. तब्बल 90 हजारांचं वाचूयात लोकशाही मराठीच्या रिअॅलिटी चेकमध्ये काय वास्तव समोर आलंय.
बीडच्या चऱ्हाटा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणीसाठी गेले, तेव्हा त्यांना जे वास्तव दिसलं ते पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या आरोग्य केंद्राची उभारणी पाच वर्षांपूर्वी झाली. प्रशस्त इमारत आणि विस्तीर्ण जागा असं या आरोग्य केंद्राचं स्वरूप आहे. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हापासून या इमारतीची उभारणी झाली तेव्हापासून इथं विजेची जोडणी झालेलीच नाही... त्यामुळे या रुग्णालयात पंखे लावले आहेत. ट्युबलाईट जोडलेल्या आहेत पण त्या बंद म्हणजे अगदी बंद अवस्थेत आहेत.
डॉ. मदन काकड, आरोग्य अधिकारी यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, त्यावेळेस ते म्हणाले की, "हे तर झालं वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी आणि संतापजनजक प्रकाराचं धडधडीत वास्तव समोर आलं आहे. पण इथं येणाऱ्या रुग्णांना वीजच नसल्यामुळे आरोग्याच्या सेवा मिळत नाहीयत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लांबचा पल्ला गाठत बीडला जावं लागतंय."
रुग्णासोबत बातचीत केल्यांनतर ते म्हणाले की, "अचानक पेशंट आले तर त्यांना उपचार द्यायचे कसे आधीच वीज नाही. मग सोनोग्राफीसारख्या मशिन्स बंद असतात. त्यामुळे पेशंटला बीडला पाठवावं लागतं. असं आरोग्य सेविका सांगतात.
आरोग्यसेविका एम. एम. तांदळे, यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे, त्यावेळेस ते म्हणाल्या की, "एकतर देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ती सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे. त्यासाठी सरकार ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांची उभारणी करतं. पण तिथं जर वीज नसेल आणि इतर सुविधा नसतील तर, अशा आरोग्य केंद्रांच्या बुजगाण्यांचा काय फायदा आणि त्यातही वीज जोडणी नसताना विजेचं बिलं पाठवणं म्हणजे, हे तर मूर्खपणा शब्दाच्या पलीकडचंच झालं.