Manikrao Kokate | Lokshahi Marathi Sanwad 2025 : "क्रीडा धोरण युवा धोरण हे लागू करावं लागेल"
लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज "उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आणि दीपक बिल्डर अॅंड डेवलपर्स प्रस्तुत या कार्यक्रमाला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील? यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार आहे. तसेच महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली आणि छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना सरकारकडून क्रीडा धोरण युवा धोरण या संदर्भात काय उपाययोजना करण्यात आली आहे ? प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,.......
माणिकराव कोकाटे म्हणाले की... क्रीडा प्रेमींना व युवकांना जास्तीत जास्त क्रीडा क्षेत्राकडे वळवाव लागेल नाही तर युवक हे व्यसनाधीन कडे वळतील असं मला वाटतं त्यासाठी युवकांना कशा पद्धतीने क्रीडाकडे वळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू खेळाडूंना 5% आरक्षण आहे. पण मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की या ठिकाणी खेळाडूंना दहा टक्के आरक्षण द्यावे जेणेकरून क्रीडा क्षेत्र वाढवण्यासाठी मेडल्स मिळालेली लोक मोठ्या नॅशनल वर खेळलेली लोक या क्रीडाच्या माध्यमातून या विभागात येतील आणि क्रीडा विभागाची प्रगती होईल
क्रीडा धोरण युवा धोरण हे लागू करावं लागेल
अनेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुलन हे नादुरुस्त अवस्थेत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वादांमुळे संपूर्ण तयार झाली नाही सहाशे कोटी रुपये आज क्रीडा विभागाच्या त्या जिल्ह्याच्या खात्यामध्ये पडलेले आहेत मात्र क्रीडा संकुलनाचे काम अद्याप कुठेही सुरू नाही त्याची काही कारण लक्षात आली असून उदाहरण द्यायचं म्हटलं तर म्हणजे मागच्या आमदाराने जर जागा फायनल केलेली असेल तर आताच्या आमदाराला ती जागा नको असते काही ठिकाणी परिसरातील नागरिकांकडून विरोध होत असतो अशा वादामुळे क्रीडा संकुलनाची काम थांबलेली आहेत.