'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
Published by :
shweta walge

शनिवारी बारामतीमध्ये झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, अशी टीका केली होती. यावरच 'देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील' असा पलटवार करत अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

श्रीनिवास पवार काय म्हणाले?

अजित पवार यांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. अजित पवार यांच्यापाठी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. मात्र, शरद पवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि जनसंपर्क बारामतीमध्ये वरचढ

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका
Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com