आजपासून मिळणार दहावीचे हॉलतिकीट

आजपासून मिळणार दहावीचे हॉलतिकीट

दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दहावीच्या लेखी परीक्षेस 2 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 10 फेब्रुवारीपासून प्रात्याक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे.अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. तर सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता पेपर होणार आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला दिली जात होती. मात्र यावेळी राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याच्या सूचना केंद्रांना दिले आहेत.

राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ होण्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी द्यावी. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडेत्वरित पाठवावे असेही मंडळाकडून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com