पुण्यात SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ

पुण्यात SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ

पुण्यात SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यात SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा मुलांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच गेट बंद करून घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.

वेळेआधीच गेट बंद केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संत्पक वातावरण आहे. हडपसरच्या सहयोग डिजिटल केंद्रावर हा प्रकार घडला आहे. अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ट्रॅफिक आणि कामावर जाणारे लोकांची गर्दीमुळे विद्यार्थ्यांना 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हुजेरगिरी करत गेट बंद केल्याची घटना घडली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com