गुणरत्न सदावर्तेंकडून आजपासून एसटी बंदचा इशारा

गुणरत्न सदावर्तेंकडून आजपासून एसटी बंदचा इशारा

एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून एसटी बस बंदची हाक देण्याता आली आहे.
Published by :
Team Lokshahi

एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून एसटी बस बंदची हाक देण्याता आली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळला दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटीने घरी जाणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबर पासून एसटी संपाची हाक दिली असली तरी, महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुसूचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे.

या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे, पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार, कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com