ST Bus Ticket Price: महाराष्ट्र एसटीच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ, ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका

ST Bus Ticket Price: महाराष्ट्र एसटीच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ, ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ केली आहे. पुणे, सोलापूर, नागपूर आणि इतर मार्गांवर प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व सामान्याची लाल परी म्हणून ओळख असलेल्या एसटी आता सामान्याच्या खिशाला दरवाढ करण्याचा फटका देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आणि सामान्यांच्या लालपरीचे तिकीट दर वाढणार असून, एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. प्रत्येक 6 किलोमीटरच्या एका टप्प्यामागे किमान 1रुपया 35 पैसे ते कमाल 3 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे. इंधनाची वाढते तर सुट्ट्या वाढत्या किमती यामुळे भाढेवाड केल्याची माहिती स समोर येत आहे.. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाल्याने आजपासून तिकिटाचे नवे दर सुरु झाले आहे.

पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर एसटी धावतात. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या आगारातून दैनंदिन एक हजारापेक्षा जास्त परिवहन महामंडळाच्या बस ये-जा करतात. यातून लाखो प्रवासी ये-जा करतात. शिवाय सरकारच्या सवलतीमुळे एसटीचे प्रवासी लाखोंच्या पटीने वाढले आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी आहे. शिवाय दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी, एसटीचे सुटे पार्ट इत्यादी गोष्टींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तिकीट दरात दरवाढ करणे अपेक्षित आहे, असे परिवहन मत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसटीच्या लाखो प्रवाशांना एसटीच्या तिकीट दरात 14.95 टक्के वाढ केल्यामुळे मोठा फटका बसणार आहे

अशी होणार तिकीट दरवाढ (साधी लालपरी)

ठिकाण सध्याचे तिकीट दर वाढणारे तिकीट दर (अंदाजे)

पुणे - सोलापूर 365-420

पुणे - गाणगापूर 530-610

पुणे - छ. संभाजीनगर 365-420

पुणे - अमरावती 860-990

पुणे - नागपूर 1080-1245

पुणे - पणजी 670-770

पुणे - बेळगाव 530-610

पुणे - हैदराबाद 745-970

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com