ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प; एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन

ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प; एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन

ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होणार
Published on

ऐन गणेशोत्सवात एसटी सेवा ठप्प होणार असल्याची माहिती मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून आजपासून आंदोलन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. लाखो चाकरमानी गावी जात असतात. यातच आजपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची त्यांची मागणी आहे. तसेच 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ, 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com