आजच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार; सरकारकडून 300 कोटी वितरित

आजच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार; सरकारकडून 300 कोटी वितरित

आजच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार; सरकारकडून 300 कोटी वितरित
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. सरकारकडून 300 कोटी वितरित करण्यात आले आहे. संक्रांतीचा सण अगदी जवळ आलाय यातच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. ते पगार होण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून 300 कोटी वितरित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने या संदर्भात एक परिपत्रक देखिल काढले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना 12 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नाही. तसा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला आहे. राज्य सरकारकडून न्यायालयात 7 तारखेदरम्यान पगार होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सरकारकडून 300 कोटी वितरित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com