ST BUS : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे एसटी भाडेवाढीचा अखेर रद्द

ST BUS : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे एसटी भाडेवाढीचा अखेर रद्द

राज्यातील पुरस्थितीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने केलेली १० टक्के भाडेवाढ अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • एसटी महामंडळाने केलेली १० टक्के भाडेवाढ अखेर रद्द

  • हंगामी दरवाढही फायद्याची नाही

  • सणासुदीच्या निमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्या दिलासा मिळणार

राज्यातील पुरस्थितीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाने केलेली १० टक्के भाडेवाढ अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने एसटीने प्रवास करणाऱ्या दिलासा मिळणार आहे. राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली ही १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हंगामी दरवाढही फायद्याची नाही

एसटी महामंडळ सणासुदीत आणि सुट्ट्याच्या हंगामात वाढणारी प्रवासी संख्या गृहीत धरुन हंगामाचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्यात मे महिन्यात हंगामी भाडेवाढ जाहीर करत असतात.त्यामुळे एसटी महामंडळा मोठा फायदा होत असतो. परंतू गेल्या काही काळात हंगामी भाडेवाढ करुनही एसटी महामंडळाला म्हणावा तसा फायदा मिळालेला नाही. कारण एसटीच्या गाड्यांची कमी संख्या, नादुरुस्त गाड्या आणि वाढलेल्या दरामुळे आता प्रवासी खाजगी गाड्यांकडे वळला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com