Goa : गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; 30 जण जखमी

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. लैराई देवीचे मंदिर गोव्यात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

गोव्यातील शिरगाव या ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिरा श्री लैराई देवीच्या यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com