ताज्या बातम्या
प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांमधील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या, सोलापूर पोलिसांना यश
प्रणित मोरे मारहाण प्रकरणात सोलापूर पोलिसांना यश
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे खुप चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी त्याने एका शो दरम्यान अभिनेता वीर पाहारियावर विनोद केले होते. यामुळे काही जणांनी त्याच्यावर हल्ला करत मारहाणदेखील केली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल केला होता. चार जणांना अटकदेखील केले होते. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार होता.
प्रणितने व्हिडीओ शेअर करत या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना पकडण्यात यावे अशी विनंती पोलिसांना केली होती. त्यादृष्टीने पोलिस तपास करत होते. यामध्ये आता पोलिसांना यश आले आहे. सोलापूर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी तनवीर शेखला ताब्यात घेतले आहे.