आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प
Admin

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on: 

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अधिवेशनात एकूण १३ विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com