ताज्या बातम्या
राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक; पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता
राज्यमंत्रिमंडळची आज सह्याद्रीवर बैठक होणार आहे.
थोडक्यात
राज्यमंत्रिमंडळाची आज सह्याद्रीवर बैठक
राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची दाट शक्यता
राज्यमंत्रिमंडळाची बैठक सायंकाळी 5 वाजता होणार
राज्यमंत्रिमंडळची आज सह्याद्रीवर बैठक होणार आहे. यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु आहे ती पालकमंत्रिपदाची. या बैठकीत राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यमंत्रिमंडळाची बैठक सायंकाळी 5 वाजता होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून आज धनंजय मुंडेंच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष असणार आहे. राज्यातील विकास कामे, मुंबईतील प्रदूषणाचा विषय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.