Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; या महत्वाच्या निर्णयाची शक्यता

गणेशोत्सवानंतर आज शिंदे - फडणवीस सरकारची बैठक आहे. या बैठकीच महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गणेशोत्सवानंतर आज शिंदे - फडणवीस सरकारची बैठक आहे. या बैठकीच महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीला भेगा पडणं,भूस्खलन होणं, दरड कोसळणं यासारख्या घटनांमध्ये मदत करण्यासाठीचं महत्वाचे धोरण येण्याची शक्यता आहे. आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बैठकीत शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादाची चर्चा होऊ शकते. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावरही कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते.

राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लंम्पी या आजारावर आणि उपचारावर चर्चा आणि त्यावर उपाययोजना काय असतील यावर चर्चा होऊ शकते. राज्याच्या या नव्या पुनर्वसन धोरणामध्ये नवे निकष आणि नियमातील सुधारणा यांचा समावेश असणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदतीची रक्कम देण्यासाठी लागणार विलंब याचा देखील विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे. मागे झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत गोविंदांना मदतीच्या निर्णयासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com